महिला युट्यूबरसह सहा जणांना अटक   

हेरगिरीचे जाळे उदध्वस्त 

पाकिस्तानसाठी हेरिगिरी करणारी हरयानातील एका महिला युट्यूबरसह सहा जणांना एनआयएने अटक केली आहे. भारताची संवेदशील माहिती पाकिस्तानला पुरविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या कारवाईमुळे हरयाना आणि पंजाबमधील हेरगिरीचे जाळे नष्ट होण्यास मदत मिळाली आहे. 
 
ज्योती मल्होत्रा, असे युट्यूबरचे नाव आहे. ती ट्रॅव्हल वीथ जो नावाचे युट्यूब चॅनल चालवत होती. २०२३ मध्ये ज्योतीने पाकिस्तानचा दौरा केला होता, असे तपासात उघड झाले. व्हिसा प्राप्त केल्यानंतर सहली आयोजन करण्यासाठी कमिशन एजंट म्हणून ती काम करु लागली होती. या माध्यमातून तिने नवी दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्च आयुक्तालयातील कर्मचारी इशान उर रहीम उर्फ दानिश याच्याशी संपर्क वाढविला होता. त्याने ज्योतीची भेट विविध पाकिस्तानी गुप्तचरांशी घालून दिल्याप्रकरणी भारत सरकारने १३ मे २०२५ रोजी दानिशची देशाबाहेर हकालपट्टी केली होती.

Related Articles